आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडसमाेर विंडीजची फलंदाजी ढेपाळली, विंडिज दुसऱ-या दिवसअखेर ४ बाद १५५

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँटिग्वा - पहिल्या कसाेटीत इंग्लंडच्या टीमला चाेख प्रत्युत्तर देण्यास मैदानावर उतरलेल्aया यजमान विंडीज संघाने दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात ४ बाद १५५ धावा केल्या अाहेत. इंग्लंडच्या अखेरच्या ५ फलंदाजांनी ५८ धावांतच तंबूचा रस्ता धरल्याने त्यांचा संपूर्ण डाव ३९९ धावांतच अाटाेपला.

इंग्लंडच्या फलंदाजांनी त्यांचा डाव ५ बाद ३४१ पासून प्रारंभ केला. इंग्लंडचे अखेरचे फलंदाज झटपट तंबूत परतल्याने त्यांना चारशेचा अाकडा अाेलांडता अाला नाही. त्यानंतर विंडीजने फलंदाजीला प्रारंभ केला. जाॅर्डनने डॅरेन ब्राव्हाेला १० धावांवर बाद झाल्याने विंडीजच्या गाेटात चिंता पसरली. सॅम्युअल्स व क्रेग ब्रेथवेट यांच्यात झालेली ४७ धावांची भागीदारी ब्राॅडने माेडून काढली. सॅम्युअल्स (३३) बाद झाल्यावर अखेरच्या सत्रापूर्वी विंडीजची अवस्था ४ बाद ९९ अशी झाली हाेती.

अँडरसनचा ३८१ वा बळी
इंग्लंडचा गाेलंदाज अँडरसनने शानदार गाेलंदाजी केली. वेस्ट इंडीजचा सलामीचा फलंदाज डेव्हन स्मिथला ११ धावांवर बाद करत अँडरसनने त्याचा ३८१ वा बळी पटकावला. अँडरसनचा शंभराव्या कसाेटीतील हा पहिला बळी असून अजून तीन बळी घेतल्यावर ताे इंग्लंडचा सर्वाधिक बळी मिळवणारा गाेलंदाज ठरला अाहे. अाता त्याच्याकडून तिसऱ्या दिवशी चांगल्या कामगिरीची अाशा अाहे.