आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजचा संघ ढेपाळला !, सॅम्युअल्सच्या चिवट खेळीने सावरला विंडीजचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेंट जाॅर्जेस, ग्रॅनाडा - दुस-या कसाेटीच्या पहिल्याच दिवशी विंडीजची फलंदाजी काेसळत असताना एकमेव मार्लन सॅम्युअल्स धीराेदात्तपणे उभा राहिला. सॅम्युअल्सने दिवसअखेरपर्यंत केलेल्या नाबाद ९४ धावांच्या खेळीमुळे विंडीजला दिवसअखेरपर्यंत ५ बाद १८८ धावांपर्यंतचा पल्ला गाठता अाला.

सॅम्युअल्सने अत्यंत शांतपणाने एक बाजू लावून धरल्याने पहिल्या दिवसअखेर विंडीजला दाेनशेच्या अासपास पाेहाेचणे शक्य झाले अाहे. दिनेश रामदीनसमवेत सॅम्युअल्सने सहाव्या गड्यासाठी नाबाद ५९ धावांची भागीदारी उभारली.

असा काेसळला डाव
विंडीजची धावसंख्या दाेन असतानाच सलामीवीर ब्रेथव्हाइट बाद झाला. त्यानंतर १५ धावा करून स्मिथ माघारी परतला. ब्रावाे-सॅम्युअल्स यांची भागीदारी होत असतानाच ब्रावाे ३५ धावांवर बाद झाला, तर त्यानंतर अालेला चंदरपाॅलदेखील अवघी एक धाव काढून तंबूत परतला.