पोर्ट ऑफ स्पेन - न्यूझीलंड विरुध्द वेस्ट इंडीज दरम्यान झालेल्या दुस-या कसोटीमध्ये वेस्ट इंडीजने कीवींचा 10 विकेट पराभव केला.
वेस्ट इंडिजला दुस-या डावात विजयासाठी 93 धावाचं लक्ष्य होते. ते सहज पार करत गेलने अवघ्या 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याने नाबाद 80 धावा केल्या. गेलले 46 चेंडूत 80 धावा केल्या, यामध्ये सात चौकार, आणि सहा चौकारांचा समावेश आहे.
न्यूझीलंडने तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेमध्ये 1-0 अशा आघाडी घेतली होती. त्यामुळे वेस्ट इंडीज संघ सुरुवातील दबावात आला होता. परंतु सांघिक उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर वेस्ट इंडीजने मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे.
वेस्ट इंडीजच्या केमार रोचने 74 धावा देत चार फलंदाजांना तंबूची वाट दाखविली. जर जेरॉम टेलर, शेनॉन गॅब्रियल आणि सुलीमन बेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळविल्या.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची छायाचित्रे..