आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेस्ट इंडीज टीमकडून झिम्बाब्वेला क्लीन स्वीप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अँटिगुआ - वेस्ट इंडीजने दोन टी-20 सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेला 2-0 ने क्लीन स्वीप दिला. विंडीजने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा सामना 41 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 7 गडी गमावून 158 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला 6 गड्यांच्या मोबदल्यात 117 धावा काढता आल्या. सामन्यात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करणारा सॅम्युअल्स ब्रदी (3/17) सामनावीर, तर एल. सिमन्स मालिकावीरचा मानकरी ठरला. विंडीजने पहिला सामना 8 गड्यांनी जिंकला होता.

धावांचा पाठलाग करणा-या झिम्बाब्वेकडून चिंभाभा 13 व मस्कदझा 53 धावा काढल्या. इतर फलंदाज अपयशी ठरले. यामुळे झिम्बाब्वेला 117 धावांवर गाशा गुंडाळावा लागला. गोलंदाजीत बद्रीने 17 धावा देत 3 बळी घेतले. ही त्याची करिअरमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. ब्राव्होने 15 धावा देत 2 बळी घेतले.

तत्पूर्वी विंडीजला सिमन्स (41), चार्लस (10), ब्राव्हो (24) यांनी चांगली सुरुवात करून दिली. पाचव्या क्रमांकावर आलेल्या पोलार्डने नाबाद 45 धावा काढल्या. त्याने 24 चेंडूंत तीन चौकार व तीन षटकार ठोकून संघाला 45 धावांचे योगदान दिले.
सामनावीर : सॅम्युअल्स बद्री
(वेस्ट इंडीज)
मालिकावीर : एल. सिमन्स (वेस्ट इंडीज)
2-0 ने विंडीजचा मालिका विजय
पहिला सामना- वेस्ट इंडीज वि. वि. झिम्बाब्वे (8 गड्यांनी विजय)
दुसरा सामना- वेस्ट इंडीज वि. वि. झिम्बाब्वे (41 धावांनी)
संक्षिप्त धावफलक- वेस्ट इंडीज- 7 बाद 158 धावा, झिम्बाब्वे-6 बाद 117 धावा