आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वार्षिक आवक घटल्यामुळे ‘विंडीज’ला भारताचे निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सचिन तेंडुलकरला कसोटींचे द्विशतक झटपट आणि देशातच व्हावे यासाठी घाईगडबडीने दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍याआधी वेस्ट इंडीज संघाला दोन कसोटींच्या छोटेखानी दौर्‍याचे निमंत्रण देण्यात आल्याच्या वृत्तात तथ्य नाही. प्रत्यक्षात आगामी वर्षात भारतात फारसे कसोटी सामने होणार नाहीत. त्यामुळे बीसीसीआयला प्रचंड आर्थिक तोटा होणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी जेथे जेथे आणि जेव्हा

जेव्हा भारतात पाहुण्या संघांना मालिकेसाठी निमंत्रित करण्याची संधी मिळणार आहे, त्या वेळी बीसीसीआयने कसोटी व एकदिवसीय सामने आयोजित करण्याचे ठरवले आहे.

श्रीनिवासन काय आता फक्त दोन महिन्यांचे पाहुणे आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी दुसरा अध्यक्ष येणार. त्यामुळे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा त्यांच्या इच्छेनुसारच होणार, असे लॉरगॅट यांनी आपल्या सहकार्‍यांना सांगितल्याचे कळते.

कसोटी आयोजनाची एमसीएची विनंती : दरम्यान, सचिन तेंडुलकरची दोनशेवी कसोटी मुंबईला आयोजित करण्याची संधी मिळाली तर तो आमचा बहुमान असेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे. ही कसोटी मुंबईला मिळावी यासाठी असोसिएशन बीसीसीआयला पत्राद्वारे विनंती करणार आहे. हा सामना मुंबईला झाला तर चाहत्यांसाठी सचिनसाठीही हा क्षण महत्वाचा असेल.
लॉरगॅटमुळे बीसीसीआय नाराज
आफ्रिका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या पूर्व संमतीशिवाय भारतीय दौर्‍याचा कार्यक्रम निश्चित केला. बीसीसीआयबरोबर अनेकदा खटके उडालेल्या आयसीसीचे माजी सीईओ हरून लॉरगॅट यांची दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी या पदावर झालेली नियुक्तीही बीसीसीआयला रुचली नाही. नियुक्तीनंतर लॉरगॅट यांनी उधळलेली मुक्ताफळेही भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील क्रिकेट संबंधांवर परिणाम करणारी ठरली आहेत, असे एका अधिकार्‍याने सांगितले.

लॉरगॅटला कोंडीत पकडणार ?
लॉरगॅट यांना कोंडीत पकडण्यासाठीच आपला हिसका दाखवताना श्रीनिवासन यांनी आर्थिक तोट्याचे कारण पुढे करून वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा भारताचा दौरा आयोजित केला आहे. सचिनच्या दोनशेव्या कसोटीचा या दौर्‍याच्या आयोजनामागे सुतराम संबंध नाही, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. प्रत्येक कसोटी सामन्यामागे बोर्डाला तीन कोटी रुपये मिळतात. प्राप्तिकर विभागासह अन्य देणी व वाढता खर्च तसेच जागतिक आर्थिक मंदीची झळ पोहोचलेल्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डालाही आता आपली आवक वाढवण्याबाबत विचार करावा लागला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डावर यानिमित्ताने दबाव टाकण्याची संधी मिळणार आहे.