आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत दौ-यात टीमची कामगिरी उंचावण्याचा निर्धार : डॅरेन सॅमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- मागील भारत दौ-यात आमच्या टीमचा 2-0 असा दणदणीत पराभव झाला होता. आता त्यावेळच्या संघापेक्षा सध्याचा विंडीजचा संघ अनुभवी असून आमची कामगिरी गतवेळेपेक्षा उंचावण्याचाच आमचा प्रयत्न असल्याचे विंडीजचा कर्णधार डॅरेन सॅमी याने म्हटले आहे. 6 नोव्हेंबरपासून सुरू होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका भारताला सोपी जाणार नसल्याचा इशारादेखील सॅमीने दिला.

आम्ही सहा कसोट्या सलग जिंकून भारताच्या दौ-यावर दाखल झालो आहोत. न्यूझीलंड, बांगलादेश आणि झिम्बाब्वे या तीन देशांसमवेत झालेल्या प्रत्येकी दोन कसोटी सामन्यांमध्ये आम्हाला विजय मिळाला आहे. शिवनरेन चंदरपॉल हा 148 कसोटी खेळून दीडशेव्या कसोटीपासून दोन कसोटी लांब आहे. त्यामुळे दीडशे कसोटी खेळणारा तो पहिला विंडीजचा फलंदाज ठरणार असल्याचेही सॅमी म्हणाला. त्याच्यामुळे आमच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचे चांगले मिश्रण असून त्यामुळे आमचा संघ समतोल झाला आहे.

मागील संघात अनुभवींचा भरणा
मागील 2011 मध्ये भारत दौ-यावर आलेल्या संघात कसोटीचा फारसा अनुभव नसलेल्या नवोदित खेळाडूंचा अधिक भरणा होता. त्यामुळे यजमान भारताला आम्हाला हरवणे सहज शक्य झाले होते. आता संघात चांगले दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि शेन शिलिंग फोर्डच्या रूपाने दर्जेदार फिरकी गोलंदाज आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सर्व आमच्या क्षमतेनुसार खेळल्यास आम्ही कोणत्याही बलाढ्य संघाशी अटीतटीची लढत देऊ शकतो, असेही सॅमीने नमूद केले. या मालिकेत एकतर्फी विजय मिळवण्याचा मानसही त्याने व्यक्त केला.

आजपासून उत्तर प्रदेशविरुद्ध सराव सामना
वेस्ट इंडीज व उत्तर प्रदेश क्रिकेट संघ यांच्यात गुरुवारपासून तीनदिवसीय सराव सामन्याला सुरुवात होत आहे. भारताविरुद्ध दोन कसोटी सामन्यांपूर्वी विंडीज संघ सराव सामने खेळणार आहे. भारत दौºयावर आलेल्या पाहुण्या वेस्ट इंडीज संघाने बुधवारी आपल्या सरावाला प्रारंभ केला. उत्तर प्रदेश टीमच्या खेळाडूंनीही दिवसभर सराव केला.
विंडीजचा घातक गोलंदाज सुनील नरेनची अनुपस्थितीत ही यजमान संघाची आनंदाची गोष्ट आहे. मात्र, टीममध्ये शेन शिलिंगफोर्ड व पेरमॉलचा समावेश आहे.