आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताने श्रीलंकेला तिरंगी मालिकेत हरवून मालिका आपल्या नावावर केली. धोनीने विजयासाठी 15 धावा बाकी असताना दोन षटकार व एक चौकार मारून तो दृष्टीक्षेपात आणला. श्रीलंकेने भारताला विजयासाठी 202 लक्ष्य ठेवले होते. त्याचा पाठलाग करताना भारताने 49 षटकात 8 बाद 203 धावा केल्या.
दरम्यान भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. श्रीलंकेचे जादा धावा होणार नाही याची काळजी धोनीच्या संघाने घेतली. 48 षटकात श्रीलंकेने 201 धावा केल्या.
भुवनेश्वर कुमार
या तिरंगी मालिकेत भुवनेश्वर कुमारने त्याच्या स्विंगने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. आजही त्याने श्रीलंकेला सातव्या ओव्हरमध्ये पहिला झटका देऊन स्विंगची कमाल दाखवून दिली. उपुल थरंगाला त्याने कर्णधार धोनीकरवी झेल बाद केले. त्यानंतर कारकिर्दीतील 400 वा एकदिवसीय सामना खेळत असलेल्या जयवर्धनेची त्याने विकेट घेतली.
बाहेर जाणा-या चेंडूला उगाच छेडल्याने स्लिपमध्ये बॉल उडाला आणि तिथे असलेल्या अश्विनने कोणतीही चूक न होऊ देता तो टिपला. 28 बॉलमध्ये 22 रन्स काढून महेला जयवर्धनेला तंबूत परतला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.