Home »Sports »From The Field» West Indies Vs Zimbabwe Oneday Cricket

विंडीजची झिम्बाब्वेवर 156 धावांनी मात

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 07:50 AM IST

  • विंडीजची झिम्बाब्वेवर 156 धावांनी मात

सेंट जॉर्ज - जॉन्सन चार्लस (130) व डॅरेन ब्राव्हो (100*) यांच्या तुफानी शतकी खेळीच्या बळावर वेस्ट इंडीजने पहिल्या वनडेत झिम्बाब्वेवर 156 धावांनी मात केली.

या विजयासह विंडीजने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वन डे रविवारी होईल. वेस्ट इंडीजने 50 षटकांत 4 बाद 337 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने 9 गडी गमावून 181 धावांपर्यंत मजल मारली. झिम्बाब्वेकडून क्रेग इर्विन 41, मॅक्लम वालरने 51 धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांना पराभव टाळता आला नाही. तत्पूर्वी विंडीजकडून सामनावीर चार्लसने 111 चेंडूत 12 चौकार व चार षटकारांच्या साहाय्याने 130 धावा काढल्या. डॅरेन ब्राव्होने (100) नाबाद शतक ठोकून संघाचा विजय निश्चित केला.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज 4 /337, झिम्बाब्वे 9/181.

Next Article

Recommended