आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Indies Won And Pakistan Failed In ICC Trophy London

ICC: वेस्ट इंडीजची विजयी सलामी; पाकिस्तानचा दोन गड्यांनी पराभव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वेस्ट इंडीजने शुक्रवारी पाकिस्तानवर 2 गड्यांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकने 170 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजने 40.4 षटकांत लक्ष्य गाठले.

धावांचा पाठलाग करणार्‍या विंडीजचे चार्ल्स (9) व ब्राव्हो (0) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर गेल (39) व सॅम्युअल्स (30) यांनी 63 धावांची भागीदारी करून धावसंख्येला गती दिली. तसेच पोलार्ड (30) व कर्णधार डी. ब्राव्होने (19) सहाव्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रामदिन (11) व रोचने (5) नाबाद खेळी करून विंडीजला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी पाकचे फराहत (2) व हाफिज (4) झटपट बाद झाले. विंडीजच्या रोचने या दोघांना बाद केले. अखेर जमशेद (50) व मिसबाहने (96*) चौथ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी करून पाकला सन्मानजनक स्कोअर उभा करून दिला..
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान : सर्वबाद 170 धावा, वेस्ट इंडीज : 8 बाद 172 धावा.

रोच, नारायणची घातक गोलंदाजी
पाकविरुद्ध सामन्यात केमार रोच व सुनील नारायणने घातक गोलंदाजी केली. रोचने दहा षटकांत 28 धावा देत तीन बळी घेतले. तसेच ऑफस्पिनर सुनील नारायणने दहा षटकांत 34 धावा देत तीन विकेट घेतल्या.

इंग्लंड-ऑस्ट्रेलिया आज सामना
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शनिवारी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क खेळणार नाही.