मुंबई - लाहील येथे येत्या १५ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणा-या पूर्वविभागाविरुद्ध दुलीप करंडक क्रिकेट सामन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या पश्चिम विभागीय संघात महाराष्ट्राच्या विजय झोल, हर्षद खडिवाले, अंकित बावणे, अक्षय दरेकर श्रीकांत मुंडे यांचा समावेश आहे.
पश्चिम विभागीय संघ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), पार्थिव पटेल, विजय झोल, हर्षद खडिवाले, सौरभ वासकर, सूर्यकुमार यादव, अंकित बावणे, युसूफ पठाण, आदित्य तरे, अक्षर पटेल, अक्षय दरेकर, धवल कुलकर्णी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत भुमरा, श्रीकांत मुंडे, व्यवस्थापक : श्रीकांत तिगडी.
अंकित, विजयची कामगिरी
मराठवाड्यातील गुणवंत फलंदाज अंकित बावणेने गेल्या रणजी सत्रात तब्बल ७३१ धावा ठोकल्या. यात त्याने एक शतक आणि ७ अर्धशतके लगावली. सध्या सुरू असलेल्या भाऊसाहेब निंबाळकर ट्रॉफीत २९ सप्टेंबर रोजी अंकितने बडोदाविरुद्ध नाबाद २०२ धावांची जबरदस्त खेळी केली. त्यानंतर मध्य प्रदेशाविरुद्ध अर्धशतक ठोकले. विजय झोलने शानदार द्विशतक लगावत गतवर्षी रणजीत पदार्पण केले. त्याने एकूण ९ लढतीत ५५३ धावा काढल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेशदेखील आहे.