आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Western Divisional One Day : Mumbai Win Over Vododara

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम विभागीय वनडे स्पर्धा : मुंबईचा बडोद्यावर शानदार विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बीसीसीआयच्या पश्चिम विभागीय वनडे स्पर्धेत मुंबईने बडोद्यावर 17 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईचे 4 गुण झाले आहेत. अष्टपैलू कामगिरी करणा-या इकबाल अब्दुल्लाला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एमसीए स्टेडियम, पुणे येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 49.5 षटकांत 236 धावा काढल्या.यात सलामीवीर वसीम जाफरने 42 धावा तर शोएब शेखने 68 चेंडूत 51 धावा केल्या. इकबालने 32 चेंडूत 2 चौकार व तेवढेच षटकार खेचत 43 धावा ठोकल्या. सूर्यकुमार यादव (20), अनुप रेवणकर (28) आणि आदित्य तारे (25) मोठी खेळी करू शकले नाहीत.


बडोद्याच्या सुनीत सिंगने 3 बळी घेतले. प्रत्युत्तरात बडोद्याचा संघ निर्धारित षटकांत 9 बाद 219 धावा करू शकला. अंबाती रायडूचे (52) अर्धशतक व्यर्थ गेले. आदित्य वाघमोडेने 42 धावांचे योगदान दिले. इकबाल अब्दुल्लाने धारदार गोलंदाजी करत 10 षटकांत 44 धावा देत 3 गडी बाद केले. अंकित चव्हाणने 10 षटकांत 45 धावांच्या मोबदल्यात 3 गडी टिपले.