स्पोर्ट्स डेस्क- श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज, आपल्या अनोख्या शैलीने आणि भन्नाट वेगाने भल्या - भल्या फलंदाजांची धांदल उडवतो. त्याचे क्रिकेट करियर जितके इंटरेस्टिंग आहे तितकेच त्याचे पर्सनल लाईफही. यार्कर किंग' या नावाने क्रिकेट जगतात सुपरिचीत असलेला मलिंगा प्रेमात मात्र 'क्लिन बोल्ड' झाला होता. 2007 मध्ये एका जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान त्याची तान्या मिनोली पेरेरा (मॅनेजर) सोबत ओळख झाली आणि पहिल्याच नजरेत मलिंगा तिच्या प्रेमात पडला. श्रीलंकेचा 'गेम चेंजर' म्हणून ओळखल्या जाणा-या मलिंगाने मग 2010 मध्ये तान्यासोबत विवाहबध्द झाला. हॉटेलमध्ये झाली होती पहिली भेट...
- मलिंगाची पत्नी तन्याने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, 'आम्हा दोघांची पहिली भेट जाहिरातीच्या चित्रिकरणादरम्यान झाली होती.
- हिक्कदुवा मधील एका हॉटेलमध्ये मलिंगा एका जाहिरातीच्या चित्रीकरणासठासाठी आला होता. त्यावेही मी इव्हेंट मॅनेजरपदी होते.
- तेव्हापासून मलिंगा माझ्यावर प्रेम करायला लागला.
दुस-या भेटीत झाली नंबरची आदान-प्रदान-
- मलिंगा आणि तान्याची दुसरी भेट गालेतील एका हॉटेलमध्ये झाली होती. मलिंगा गाले शहरातीलच रहिवासी आहे.
- या दुस-या भेटीमध्ये दोघांनी एकमेकांना फोन नंबर शेअर केली आणि तेथून प्रेमाच्या गुजगोष्टी सुरु झाल्या. त्यांच्या प्रेमाची खरी सुरुवात येथूनच सुरु झाली. दोघेही रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत होते.
लग्नासाठी प्रेयसीच्या वडिलांना पटवले-
- मलिंगाने तन्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परंतु तान्याच्या वडिलांची परवानगी घ्यायला सांगितले.
- तान्याचे वडिल अमेरिकेमध्ये राहत होते. ते मायदेशी परतल्यानंतर मलिंगाने त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या प्रेमाविषयी माहिती दिली.
- चर्चेचे रुपांतर लग्नामध्ये झाले. 22 जानेवारी 2010 मध्ये तान्या आणि मलिंगाचा विवाह झाला. आता त्यांना दोन मुले आहेत.
विश्वचषकामध्ये दोन हॅट्रिक-
लसिथ मलिंगाने 2007 च्या विश्वचषकामध्ये हॅट्रिक केली. त्याने चार चेंडूंवर चार विकेट मिळविल्या होत्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर जवळपास हारलेला सामना जिंकून दिला होता.
लसिथ मलिंगाचे क्रिकेट करियर-
कसोटी पदार्पण : ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका, डार्विन , 01 जुलै2004.
एकदिवसीय पदार्पण : श्रीलंका विरुद्ध युनायटेड अरब अमिरात, 17 जुलै 2004.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, लसिथ मलिंगा आणि तान्याचे फोटोज...