आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीममेटच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता हा क्रिकेटर, अशी सुरु झाली लव्ह स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुश्फिकुर रहीम (डावीकडे) आणि त्याची पत्नी जनातुल (मध्यभागी) - Divya Marathi
मुश्फिकुर रहीम (डावीकडे) आणि त्याची पत्नी जनातुल (मध्यभागी)
स्पोर्ट्स डेस्क- बांगलादेशचा स्टार क्रिकेटर व कर्णधार मुश्फिकुर रहीम याच्या नेतृत्त्वाखाली बांगलादेशने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटीत पराभव केल्यानंतर रहीम चर्चेत आला आहे. मुश्फिकुरच्या क्रिकेट करियरबाबत तर लोक खूप काही जाणतात मात्र त्याच्या पर्सनल लाईफबाबत खूप कमी लोक जाणतात. त्याची लव्ह स्टोरी एकदम फिल्मी राहिली आहे. एका लग्नात सहकारी क्रिकेटर मित्राच्या मेहुणीच्या प्रेमात हा बहाद्दर पडला. सहकारी क्रिकेटरच्या मेहुणीवर जडला जीव...
 
- मुश्फिकुर रहीमची पत्नी जन्नातुल हिचा क्रिकेटर्ससे जुने नाते राहिले आहे. 
- क्रिकेट स्टारची पत्नी होण्याआधी ती बांगलादेशी क्रिकेटर मेहमुदुल्लाहची मेहुणी होती.
 
लग्नात झाली होती पहिली भेट-
 
- मुश्फिकुरने जन्नातुलला आपला सहकारी क्रिकेटर मेहमुदुल्लाह रियाद याच्या लग्नात पाहिले होते. 
- ही गोष्ट जून 2011 मधील आहे. रहीम तिच्या पहिल्या भेटीतच प्रेमात पडला होता. 
- लग्नात तो कसातरी तिच्यासोबत बोलण्यास यशस्वी झाला.
 
दोन वर्षानंतर साखरपुडा आणि नंतर लग्न-
 
- सुमारे दोन वर्षे एकमेंकाना डेट केल्यानंतर मुश्फिकुर आणि जन्नातुलने ऑक्टोबर 2013 मध्ये साखरपुडा केला. 
- यानंतर एक वर्षानंतर 25 सप्टेंबर, 2014 रोजी दोघांचे लग्न झाले. हे ग्रॅंड वेडिंग ढाकात झाले होते. 
- जन्नातुल लग्नाच्या वेळी मीरपुरमधील प्राईम यूनिवर्सिटीत शिक्षण घेत होती.
 
मुश्फिकुर रहीमचे क्रिकेट करियर-
 
- मुश्फिकुरने 55 कसोटीत 3324 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 200 इतकी आहे. 
- 176 ODI मॅचमध्ये मुश्फिकुरने 4398 धावा केल्या आहेत. या फॉर्मेटमध्ये त्याचा बेस्ट स्कोर 117 धावा आहे. 
- याशिवाय 59 टी-20 मॅचमध्ये 726 धावा केल्या आहेत. येथे त्याचा बेस्ट स्कोर 50 धावा आहे.
 
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, वाईफसोबत मुश्फिकुर रहीमचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...