Home »Sports »Latest News» When Pranab Mukherjee Turned Down Offer To Head BCCI

प्रणवदांनी नाकारले होते बीसीसीआयचे अध्यक्षपद

वृत्तसंस्‍था | Feb 17, 2013, 03:42 AM IST

  • प्रणवदांनी नाकारले होते बीसीसीआयचे अध्यक्षपद

लंडन- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष होण्याबाबत आपल्याला विचारणा झाली होती, असा खुलासा राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केला. ‘कधीही क्रिकेटची बॅट हातात घेतली नव्हती आणि खेळाविषयी फारशी माहिती नव्हती. त्यामुळे आपण हे पद नाकारले, असे ते म्हणाले.

एनकेपी साळवे स्मृती व्याख्यानमालेत बोलताना मुखर्जी यांनी शनिवारी काँग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ सहकारी साळवे यांच्याविषयी आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, ‘साळवे यांना बीसीसीआयचे अध्यक्ष होण्याचा सल्ला आपणच दिला होता. त्यांच्या काळात भारताने वर्ल्डकप जिंकला. साळवे यांच्या प्रयत्नांमुळे भारत-पाकने 1987 मध्ये संयुक्तपणे वर्ल्डकपचे आयोजन केले होते.’

Next Article

Recommended