आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND-NZ मॅचदरम्यान असे काय झाले की टेन्शनमध्ये आली रोहित शर्माची बायको!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत झालेल्या दुस-या वनडे मॅचदरम्यान क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह खूपच टेन्शनमध्ये दिसली. - Divya Marathi
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत झालेल्या दुस-या वनडे मॅचदरम्यान क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह खूपच टेन्शनमध्ये दिसली.
स्पोर्ट्स डेस्क- भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दिल्लीत झालेल्या दुस-या वनडे मॅचदरम्यान एक क्षण असाही आला की, क्रिकेटर रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह खूपच टेन्शनमध्ये दिसली. एक तर त्या सामन्यात रोहित खूपच स्लो बॅटिंग करत होता आणि त्याचदरम्यान असे काही घडले की रितिका खूपच त्रस्त झाली. तिची अवस्था तेव्हा झाली जेव्हा रोहित शर्मा मैदानात वेदनेने तळमळत होता. काय झाले होते मॅचदरम्यान...
- कोटला वनडे दरम्यान भारताच्या इनिंगची 8 वी ओवर सुरु होती.
- जेव्हा ट्रेंट बोल्टच्या ओवरमधील पहिल्याच चेंडूवर कट करण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला.
- ऑफ स्टंपच्या बाहेर जाणा-या चेंडूला छेडताच रोहितला फटका बसला व विकेटकीपर राँचीने रोहितचा झेल टिपला.
- तो बाद झाला तरी रोहित शर्मा पीचवरच उभा राहिला. तो तेथेच विव्हळत थांबला.
- रोहितने शॉट मारताच त्याचा हाताला प्रचंड वेदना होऊ लागल्या. ज्यामुळे रोहितने त्याचा खांदा पकडला व तेथेच विवळत उभा राहिला.
- खूप जबरी वेदना होऊ लागल्याने रोहितला संभाळण्यासाठी फिजियोला मैदानात यावे लागले.
- याचदरम्यान कॅमेरा रितिकाकडे फिरवला गेला तेव्हा ती खूपच टेन्शनमध्ये दिसली.
- या मॅचमध्ये रोहित 27 बॉलवर 15 धावा काढून बाद झाला.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, कशी घडली ही सारी घटना....
बातम्या आणखी आहेत...