आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार कोण ब्रेड हॅडिन की स्मिथ ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: हॅडिन आणि स्मिथ
अ‍ॅडिलेड - पहिल्या कसोटीत भारताला पराभूत केल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला अद्याप याचा जल्लोष साजरा करता आलेला नाही. त्यांचा कर्णधार मायकेल क्लार्क जखमी होऊन संघाबाहेर झाला आहे. इतकेच काय तर त्याची कसोटी कारकीर्दही धोक्यात दिसत आहे. यामुळे यजमान ऑस्ट्रेलियापुढे नवा कर्णधार निवडण्याचे संकट निर्माण झाले आहे.
यष्टिरक्षक ब्रेड हॅडिन आणि स्टीवन स्मिथ या शर्यतीत सर्वांत पुढे असल्याची चर्चा आहे. शेन वॉटसनचे नावसुद्धा चर्चेत आहे. शनिवारी सामन्यानंतर क्लार्क म्हणाला, "मी पाठीची दुखापत आणि हॅमस्ट्रिंग खूपच त्रस्त आहे. या मालिकेतून जवळपास बाहेर झालो आहे. ही दुखापत गंभीर वाटते. बहुदा मी कधीही खेळू शकणार नाही, असेही शक्य आहे.' क्षेत्ररक्षण करतानासुद्धा क्लार्क जखमी झाला होता.
अनुभवी हॅडिन
ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॅरेन लेहमन आणि टीम परफॉर्मन्स टायरेक्टर पॅट होवर्ट यांची पहिली पसंत ३७ वर्षीय हॅडिन आहे. हॅडिनने भारताविरुद्ध ज्या पद्धतीने नेतृत्व केले, त्यावरून खेळाचा त्याचा अभ्यास दिसून येतो, असे लेहमन म्हणाले. मात्र, हॅडिनसाठी वय ही मोठी अडचण ठरू शकते.
स्मिथही दावेदार
स्मिथ २५ वर्षांचा भरवशाचा फलंदाज. कसोटी, वनडे आणि टी-२० या तिघांत तो नियमित सदस्य आहे. संघाचा उपकर्णधार राहिला आहे. तो प्रदीर्घ काळ नेतृत्व करू शकतो. शिवाय ३३ वर्षीय शेन वॉटसनही शर्यतीत आहे. अष्टपैलू कर्णधार बनण्याची त्याची इच्छा आहे.