आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा सचिन कोण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर वेस्ट इंडीजविरोधात आपला 200 वा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला. माध्यमांचे सर्व लक्ष संघाच्या धावसंख्येपेक्षा सचिन तेंडुलकरवर होते. कोणासाठी क्रिकेटचा देव, कोणासाठी मास्टर ब्लास्टर तर कोणासाठी तेंडल्या असणारा सचिन आता क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. आपल्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात सचिन फॉर्मशी झगडताना दिसला. परिणामी त्याने निवृत्त व्हावे अशी चर्चा होऊ लागली, परंतु सचिनची कमतरता संघाला नक्की जाणवेल हेदेखील तेवढेच खरे आहे. आता सचिनच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. त्यापेक्षा जास्त चर्चा त्याची जागा कोण घेईल ? की त्याची जागा कोणी भरून काढणार नाही ? याची होईल. असो सचिनची जागा कोण घेईल हे फक्त खेळाडूची कामगिरी आणि त्यांची आकडेवारी पाहून सांगणे योग्य ठरणार नाही. सचिनची कारर्किद, त्याची प्रतिमा पाहता त्याची जागा सहजासहजी भरली जाणार नाही. काळ, वेळ, प्रतिमा आणि कौशल्यामध्ये प्रत्येक खेळाडू वेगळा असतो. या सर्व बाबींमध्ये यशस्वी ठरणारा खेळाडूच त्याची जागा घेऊ शकेल.
सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. अशात त्याची जागा कोण घेईल ? विराट कोहली की रोहित शर्मा? हा प्रश्न विचारला जात आहे. गेल्यावर्षी एका पार्टीमध्ये सचिनला पुढचा सचिन कोण असेल, असे विचारले असता त्याने विराट आणि रोहित शर्माचे नाव घेतले होते.