आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ललित मोदींच्या भवितव्याविषयी निश्चित दिशा ठरवणारी 25 सप्टेंबरची सभा आणि 29 सप्टेंबर रोजी होणारी वार्षिक सभा आणि निवडणुका या दोन समर प्रसंगातून मार्ग काढण्यात विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यशस्वी ठरले आहेत. श्रीनिवासन यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी एका वर्षासाठी अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दक्षिण विभागातील पाच सदस्यांनी श्रीनिवासन यांना पाठिंबा दर्शवला आहे. गोव्याचा विरोधही आता मावळल्यामुळे श्रीनिवासन यांच्या दक्षिण विभागातील सर्वच्या सर्व म्हणजे सहाही सदस्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत असे कळते. कोणत्याही पदासाठी त्या विभागाच्या किमान दोन सदस्यांचा पाठिंबा अत्यावश्यक आहे.
दक्षिण विभागातील 6 पैकी 5 सदस्यांनी पाठिंबा दिल्यामुळे आणि गोव्याचा पाठिंबाही अपेक्षित असल्यामुळे श्रीनिवासन यांचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. त्यामुळे आपल्या पूर्वीच्याच जोशात आणि उत्साहात श्रीनिवासन यांनी बोर्डाचा कारभार सुरू केला आहे. त्यांनी आज मुंबईतील बैठकीलाही उपस्थिती राखली होती. अन्य विभागातील सदस्यांचाही त्यांना पाठिंबा असून मतदानात त्यांच्या बाजूने 24 ते 25 मते पडतील, असा अंदाज आहे. बीसीसीआयचे एकूण मतदार 31 आहेत. गोव्याची मनधरणी करण्यात श्रीनिवासन समर्थक यशस्वी ठरले.
25 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे ललित मोदी यांचे भवितव्य ठरवण्यासाठी विशेष सभेचे आयोजन केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.