आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ललित मोदींचा पासपोर्ट रद्द का ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयपीएलचे निलंबित अध्यक्ष ललित मोदी यांचा पासपोर्ट का रद्द करण्यात आला, असा प्रश्‍न विचारतानाच दिल्ली उच्च न्यायालयाने परराष्ट्र मंत्रालयाला नोटीस पाठवली आहे.

मुख्य न्यायाधीश डी. मुरुगेशन आणि न्यायमूर्ती वी.के.जैन यांच्या खंडपीठाने मुंबईतील विभागीय पासपोर्ट कार्यालय अधिकारी (सीपीओ) यांना नोटीस पाठवून 29 एप्रिलपर्यंत उत्तर मागितले आहे. पासपोर्ट रद्द करण्याच्या विभागीय कार्यालयाच्या निर्णयाला माजी आयपीएल आयुक्त ललित मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.