आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या वनडेसाठी भारतीय संघ जाहीर; सेहवागला संधी मिळाली नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - बीसीसीआयने मोहाली आणि धर्मशाला येथे इंग्लंडविरुद्ध होणार्‍या अखेरच्या दोन वनडेसाठी भारतीय संघात बदल केलेला नाही. निवड समितीने सलग सुमार कामगिरीनंतरही अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवले आहे. यामुळे वीरेंद्र सेहवागचे पुनरागमन होऊ शकले नाही. टीम इंडिया आता मोहालीत चौथा वनडे 23 जानेवारी रोजी आणि धर्मशाला येथे पाचवा वनडे 27 जानेवारीला खेळेल. सलगपणे सुमार कामगिरीमुळे इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेतून सेहवागला वगळण्यात आले होते.

भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज, सुरेश रैना, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, इशांत शर्मा, भुवनेश्वर, अशोक डिंडा, शमी अहेमद.