आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधीचे सोने करीन - साहा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आलेल्या एका सामन्याच्या बंदीमुळे भारताच्या राखीव यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याला अ‍ॅडिलेड कसोटीत खेळण्याची संधी मिळत आहे. 2010 मध्ये नागपूर येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण करण्याच्या साहाने या संधीचा पुरेपूर लाभ उठवण्याचा निर्णय घेतला आहे. आज पत्रकारांशी वार्तालाप करताना साहाने सांगितले ‘मी प्रत्येक चेंडू त्या चेंडूच्या गुणवत्तेनुसार खेळणार आहे. यष्टिरक्षणाच्या वेळीदेखील खेळपट्टीच्या उसळीमुळे दडपण जाणवणार नाही.’ या मालिकेत काय घडले आहे याचा विचार न करता पुढे काय घडणार आहे, याचा आपण विचार करीत असल्याचे वृद्धिमान साहा म्हणाला.
गेल्या महिन्यात कॅनबेरा येथील ऑस्ट्रेलिया चेअरमन्स इलेव्हनविरुद्ध सामन्यात खेळल्यानंतर वृद्धिमान साहा ड्रेसिंजसममध्ये राखीव खेळाडूंच्या पंक्तीत कायम बसला होता. अ‍ॅडिलेड कसोटीत ऑस्टेलियन गोलंदाज आपल्यावर आखूड टप्प्याचा मारा करतील याबाबत साहाला खात्री आहे. त्यामुळे त्याने तशा गोलंदाजीचा सामना करण्याची मानसिकता तयार केली आहे. सौरव गांगुलीने 2009 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर बंगालचे प्रतिनिधित्व करणारा साहा हा एकमेव क्रिकेटपटू आहे. साहा म्हणतो, ‘माझ्यासाठी भारत देश प्रथम नंतर बंगाल. देशासाठी माझे सर्वस्व पणास लावून खेळायचे हेच एकमेव लक्ष मी नजरेसमोर ठेवले आहे. इमर्जिंग फ्लेअर्स संघातून खेळण्यासाठी मी याआधी ऑस्टेÑलियात आलो होतो. तेव्हा येथील खेळपट्ट्यांवर यष्टिरक्षण करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. भारतीय संघ शनिवारी नेटमध्ये सरावासाठी गोलंदाज नसल्यामुळे रविवार सराव करणार आहे.’’