आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिन्मय!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिन तेंडुलकर समारोपाच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर उतरला अन् अवघ्या क्रीडाविश्वाचे मन उचंबळून आले. लाखभर धावा, शेकडो शतके, विक्रमांची गडगंज दौलत, घरच्या मैदानावर सगेसोय-यांसमोर 200 वी कसोटी.. अन् सचिनसह चाहत्यांच्या मनातील कृतकृत्य झाल्याची भावना.. दुर्मिळ योगच हा.. सचिन क्रिकेटशी एकरूप होऊन चिन्मय झाला, तर क्रीडाविश्व सचिनमय...
* विंडीजचा पहिला डाव 182 धावांतच संपला. भारताच्या सलामीवीरांनी 77 धावांची सलामी दिली. आपल्याच संघाचा खेळाडू बाद होण्याचा जल्लोष प्रेक्षकांनी करण्याची अभूतपूर्व घटना मुरली विजय तंबूत परतल्यानंतर घडली. * कारण, सचिन तेंडुलकर मैदानात उतरत होता अन् विशाल स्क्रीनवर संदेश झळकत होता - तुमची पापणीही लवू देऊ नका! वेस्ट इंडीज संघासह पंचांनीही सचिनला मानवंदना दिली.
* सचिनच्या सुवर्णमुद्रेने नाणेफेक
सचिन तेंडुलकर
धावा चेंडू चौकार
38* 73 06
कसोटी शेवटची...दिवस पहिला
* ओझा (5) आणि अश्विनने (3) विंडीजचा पहिला डाव 182 धावांत संपवला. त्यानंतर भारताने दिवसअखेर 2 बाद 157 धावा केल्या. ३विशेष म्हणजे निवृत्तीनंतरही बीसीसीआयने सचिनसोबतचा करार कायम ठेवला.
सचिन, निवृत्ती आणि साम्य
* सचिनच्या पहिल्या कसोटीतही भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण घेतले, अखेरीसही.
धोनीच्या कारकीर्दीत पाचवी मोठी निवृत्ती
द्रविड.. लक्ष्मण.. गांगुली.. कुंबळे आणि सचिन.
सचिनची आई रजनी तेंडुलकर पहिल्यांदाच आपल्या पुत्राचा खेळ पाहण्यासाठी स्टेडियमवर आल्या. सचिनच्या कौतुकाने त्याही भारावून गेल्या.