आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्युनियर मलिक? इन्शाअल्लाह, लवकरच!, सानिया मिर्झा आई होण्याचे शोएबचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टेनिस स्टार सानिया मिर्झा आई होणार असल्याचे संकेत तिचा पती पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने दिले. त्याने ट्विटरवर टेनिसप्रेमींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ज्युनियर मलिक केव्हा येणार, या प्रश्नावर ‘लवकरच..’ असे उत्तर त्याने दिले. शोएबशी झालेली प्रश्नोत्तरे अशी :

- मुलगा झाल्यास त्याला क्रिकेटर करणार की टेनिसपटू ?
खूप अवघड प्रश्न आहे. बहुतेक क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही खेळ तो खेळेल.

- मुलगी झाल्यास नाव काय ठेवणार?
‘सध्या तरी काही ठरवले नाही, पण मिराला किंवा रीम.’

- घरी टीव्हीचा रिमोट कोणाच्या हाती असतो?
हे तर ठरलेले असते. कोणाच्या हाती असेल? सानियाच्याच हातात असतो.

- तू क्रिकेटपटू झाला नसतास तर काय झाला असतास?
तर सानियाचा मॅनेजर झालो असतो.