आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेरेना-व्हीनसला दुहेरीचे विजेतेपद; 13 ग्रँडस्लॅम जिंकली दोघी बहिणींनी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरी यश मिळवले आहे. सुरुवातीला तिने एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. यानंतर तिने आपली मोठी बहीण व्हीनस विल्यम्सला पार्टनर बनवून महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
सेरेना आणि व्हीनसच्या बिगरमानांकित जोडीने चेक गणराज्यची आंद्रिया हलावाकोवा आणि लुसी सॅफारोवा या सहाव्या मानांकित जोडीला 78 मिनिटांत सरळ सेटमध्ये 7-5, 6-4 ने नमवत किताब पटकावला. सामन्याचा निकाल एक तास आणि 18 मिनिटांत लागला. सेंटर कोर्टवर झालेल्या एकेरीच्या पहिल्याच सामन्यात पराभूत झालेल्या 32 वर्षीय व्हीनसने ‘एस’ मारून सामना जिंकला. विल्यम्स भगिनींचे आॅल इंग्लंड क्लबवर हे पाचवे आणि 13 वे दुहेरीचे विजेतेपद ठरले आहे.
व्हीनसशिवाय काहीच नाही : सेरेना - दुहेरी यश मिळाल्यानंतर भावुक झालेल्या सेरेनाने आपली मोठी बहीण व्हीनसची मुक्तकंठाने स्तुती केली. सेरेना म्हणाली, ‘व्हीनस माझी मार्गदर्शक आहे. मी तिच्याशिवाय काहीच नाही.’ व्हीनस थकव्याचा आजार असलेल्या सोग्रन सिंड्रोमची रुग्ण आहे. यामुळे ती मागच्या यूएस ओपनमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. तिने या वर्षी मियामी ओपनमध्ये पुनरागमन केले.
सेरेना, फेडरर विजयी; शारापोवाचा धक्कादायक पराभव