आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon 2013 : Paes , Bhupathi , Bopanna Advance With Contrasting Victories "

पेस, भूपती तिस-या फेरीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - भारताचा लिएंडर पेस व महेश भूपतीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील विजेतेपदाच्या आशा कायम ठेवल्या. पेस-रादेक स्तेपानेक व भूपती-नोल्स या जोडीने शनिवारी आपापल्या गटातील सामने जिंकून तिसºया फेरीत प्रवेश केला.
पेस-स्तेपानेक या जोडीने दुसºया फेरीत जॅमी डेलगादो व मॅथ्यू एब्डनचा पराभव केला. या जोडीने हा सामना 6-4, 6-4, 6-3 अशा फरकाने जिंकला. इंडो-चेक जोडीने इंग्लंडच्या जॅमी आणि ऑस्ट्रेलियाच्या एब्डनवर सहज विजय मिळवला.
दुसरीकडे भूपती-नोल्स या इंडो-ऑस्ट्रियन जोडीला विजयासाठी चार सेटपर्यंत झुंज द्यावी लागली. आठव्या मानांकित भूपती-नोल्सने लढतीत अमेरिकेच्या निकोलस मोनोरे आणि जर्मनीच्या सिमोन स्टेडलरचा 3-6, 6-4, 6-4, 6-4 अशा फरकाने पराभव केला.
क्वितोवाची आगेकूच
महिला एकेरीत चेक गणराज्यच्या पेत्रा क्वितोवा आणि अमेरिकेच्या स्लोएन स्टीफन्सने विजयी मोहीम अबाधित ठेवली. तिसºया फेरीत आठव्या मानांकित क्वितोवाने रशियाच्या एकतेरिना मकारोवाला 6-3, 2-6, 6-3 ने हरवले. क्वितोवाने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून सामन्यावर ताबा मिळवला. स्टीफन्सने चेकच्या पेत्रा चेत्कोवस्काला 7-6, 0-6, 6-4 ने पराभूत केले.

बोपन्नाचा रोमहर्षक विजय
महेश भूपती, लिएंडर पेसपाठोपाठ रोहन बोपन्नानेही विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयाची नोंद केली. त्याने रॉजर वेस्लिनसोबत पुरुष दुहेरीच्या लढतीत रोमांचक विजय मिळवला. या जोडीने डॅनियल ब्रॉड व लुकास रोसोलचा पराभव केला. बोपन्ना-वेस्लिनने तीन तास रंगलेली लढत 6-3, 5-7, 7-8, 6-7, 6-4 अशा फरकाने जिंकली. तिसºया फेरीत मिखाइल योज्नीने सर्बियाच्या व्हिक्टर त्रोईकीवर 6-3, 6-4, 7-5 ने विजय मिळवला.