(फोटोओळ - वावारिंकाला पराभूत केल्यानंतर आनंदी मुद्रेत फेडरर)
लंडन - अग्रमानांकीत सर्बिया नोवाक जोकाविकने क्रोएशियाच्या मारिन सिलिकला6-1, 3-6, 6-7, 6-2, 6-2 ने पराभूत करुन विम्बल्डनच्या उपांत्यफेरीमध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय आठ किताब जिंकणारा रॉजर फेरडररही उपांत्य फेरीमध्ये पोहोचला आहे. फेडररने स्टेनिस्लावच्या वावरिंकाला 3-6, 7-6, 6-4, 6-4 अशा फरकाने मात दिली.
नदाल पाठोपाठ मरे बाहेर
नदालपाठोपाठ गतविजेत्या अॅण्डी मरेला विम्बल्डनमधून बाहेर पडावे लागले. त्याच्यापेक्षा कमी नामांकीत बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोने मरेला सरळ सेटमध्ये पराभूत केले. दिमित्रोने मरेला 6-1, 7-6, 6-2 अशा फरकाने पराभूत केले.
पेस आणि स्टीपानेक उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा
लिएंडर पेस आणि रादेक स्टीपानेक या जोडीने नेदरलँडच्या ज्यां ज्यूलियन रॉजर आणि रोमानियाच्या होरिया टेकाऊला 6-4, 6-7, 6-4, 7-5 अशा फरकाने पराभूत करुन पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
भारताचा रोहन बोपन्ना आणि चेक गणराज्य या जोडीने आंद्रिया लावकोवाने फ्लेमिंग आणि जोसलिन रे या जोडीला 6-4, 7-5 फरकाने पराभूत करुन तिस-या फेरीमध्ये प्रवेश केला आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, सामन्यादरम्यानची छायाचित्रे...