लंडन - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोवाक योकोविकने 17 वेळ ग्रँड स्लम् विजेता रॉजर फेडररला नमवत विम्बल्डन 2014 चा किताब आपल्या नावे केला. जवळपास चार तास चाललेल्या या लढतीमध्ये नोवाकने फेडररला 6-7, 6-4, 7-6, 5-7, 6-4 अशा फरकाने पराभूत केले.
जोकोविकचे दुसरे विम्बल्डन तर 7 वे ग्रँड स्लम
2011 चॅम्पियन ठरलेला नोवाक जोकोविकचे हे दुसरे विम्बल्डन होय. या विजयामुळे टेनिस जगतामध्ये तो अव्वल स्थानी पोहोचला आहे. जोकोविकचे त्याच्या करिअरमधील हे सातवे ग्रँड स्लम आहे.
पहील्या सेटमध्ये फेडरर ठरला वरचढ
पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अत्यंत रोमांचकारी सामना पाहायला मिळाला. दोघांच्याही भेदक सर्विस होत्या. तर दोघेही दिग्गज खेळाडूंमध्ये अटीतटीची चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सेट मध्ये फेडररने एका गुणाने आघाडी मिळविली होती.
तुल्यबळ लढत
दुस-या सेटमध्ये जोकोविकने अत्यंत दमदार सर्विसला सुरुवात केली. त्याच्या सर्विसने फेडररला डबल फॉल्ट करण्यास भाग पाडले होते. आणि 43 व्या मिनिटाला दुसरा सेट आपल्या नावे केला. टायब्रेकनंरत जोकोविक फेडररवर वरचढ ठरला होता. जोकोविकने 7-6 ने हा सेट जिंकला. तर जबरदस्त पुनरागमन करीत फेडररने चौथा सेट 5-7ने जिंकून सामन्यात बरोबरी साधली. पाचवा आणि निर्णायक सेट मात्र जोकोविकने 6-4 ने जिंकत विम्बल्डनचा किताबावर आपले नाव कोरले.
पारितोषिक
नोवाक जोकोविकला 1,760,000 पौंड (जवळपास 18.5 कोटी रुपये) मिळाले. तर 17 वेळा ग्रँड स्लम चॅम्पियन ठरलेला 32 वर्षीय फेडररला 880,000 पौंड (जवळपास 10 कोटी रुपये ) मिळाले आहेत.
(फोटोओळ- विम्बल्डन 2014 च्या चषकासोबत नोवाक जोकाविक)
पुढील स्लाइडवर पाहा, फेडरर आणि जोकोविकचे सामन्यादरम्यानचे छायाचित्रे...