लंडन - दहा वर्षांपूर्वी विम्बडनवर आपले नाव कोरणारी मारिया शारपोव्हा आणि माजी चॅम्पियन नदालला विम्बल्डन 2014 मध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले.
नदाल, मारिया शरापोव्हा स्पर्धेबाहेर
पाच वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱया चौथ्या मानांकित मारिया शरापोव्हाचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. जर्मनीच्या नवव्या मानांकिन अँजेलिक केर्बरने तिचा 7-6 (7-4), 4-6, 6-4 असा पराभव केला. शरापोव्हाने 2004 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
नदालहून गैर नामांकित निक किरियोसने नदालला 7-6(5),5-7,7-6(5),6-3 असे पराभूत केले.
मरे आणि जोकोविचचे विजयी अभियान
जागतिक क्रमवारीत दुसर्या स्थानी असलेल्या नोवाक योकोविक व अँडी मरेने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. जगातील माजी नंबर वन अँना इव्हानोविकला पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या केविन अँडरसनला चौथ्या फेरीत अँडी मरेने 6-4, 6-3, 7-6 ने हरवले. तसेच महिला एकेरीत जर्मनीच्या एस. लिसिकीने चौथ्या फेरीत सर्बियाच्या अँना इव्हानोविकवर मात केली. तिने 6-4, 3-6, 6-1 ने विजय मिळवला.
पेस- कारा बाहेर
भारताचा
लिएंडर पेस आणि झिम्बाब्वेची कारा ब्लॅक या जोडीचे मिश्र दुहेरीतील आव्हान संपुष्टात आले. या चौथ्या मानांकित जोडीला अमेरिकेच्या इ. बुटोराक आणि टी. बाबोसने पराभूत केले. या जोडीने 1-6, 6-2, 6-3 अशा फरकाने सामना जिंकून तिसर्या फेरीत धडक मारली.
पुढील स्लाइडवर पाहा, विभिन्न लढतीतील निवडक छायाचित्रे...