आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : मुरे करणार का हिप हिप हुर्रे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जागतिक क्रमवारीतील दुस-या क्रमांकाचा खेळाडू अँडी मुरे विम्बल्डनमध्ये इतिहास रचण्यापासून अवघे दोन पाऊले दूर आहे. इंग्लंडकडून 77 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर विम्बल्डन विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी मुरेला जोरदार समर्थन मिळत आहे. शुक्रवारी सेमीफायनलचे सामने होणार आहेत. सेमीफायनलमध्ये मुरे 24 वा मानांकित पोलंडच्या जेर्जी जानोविक्जविरुद्ध खेळेल तर वर्ल्ड नंबर वन सर्बियाचा नोवाक योकोविक दुस-या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोविरुद्ध खेळेल. फ्रान्सची मारियन बार्टाेलीने बेल्जियमच्या कर्स्टन लिपकेन्सचा 6-1, 6-2 ने पराभव करीत फायनलमध्ये प्रवेश केला.