आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tenis: Muray First British Player Won The Wimbledon After 77 Years

अँडी मुरे ठरला 77 वर्षांनंतर विम्बल्डन जिंकणारा पहिला ब्रिटिश खेळाडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - एखादा ब्रिटिश खेळाडू विम्बल्डन जिंकू शकेल काय, हा प्रश्न गेल्या 77 वर्षांपासून विचारला जात होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. ब्रिटिश स्टार अँडी मुरेने 2013 च्या फायनलमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोवाक योकोविकला पराभूत करून विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले. यासह तो फ्रेड पॅरी (1936) यांच्यानंतर विम्बल्डन जिंकणारा पहिला ब्रिटिश चॅम्पियन ठरला आहे.


रविवारी मुरे फायनलमध्ये खेळण्यास कोर्टवर उतरला त्या वेळी मुरेवर 77 वर्षांचा इतिहास बदलण्याचा प्रचंड दबाव होता. समोर होता त्याला 11 वेळा पराभूत करणारा नोवाक योकोविक. दुसरीकडे मुरेने त्याच्याविरुद्ध फक्त 7 विजय मिळवले होते. या वेळी मुरे इतिहास घडवण्यासाठी कोर्टवर उतरला होता. मागच्या वर्षी फायनलमध्ये फेडररकडून पराभूत होणारा मुरे या वेळी चॅम्पियनप्रमाणे खेळला. त्याने 6-4, 7-5, 6-4 ने विजय मिळवला.
32 लाखांचे तिकीट : या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक चाहते आतुर होते. अनेक चाहत्यांनी एकेक तिकीट 32 लाख रुपयांपर्यंत खर्च करून स्टेडियममध्ये प्रवेश केला.


मुरेच ठरला वरचढ
मुरे आकडेवारी योकोविक
09 ऐस 04
02 डबल फॉल्ट 04
131 वेगवान सर्व्हिस 127
36 विनर्स 31
21 साध्या चुका 40
114 एकूण गुण 96


कोण आहे हा अँडी मुरे
०15 मे 1978- ग्लासगो येथे जन्म
०2005 - व्यावसायिक खेळाडू
०2007 - टॉप-10 मध्ये सामील
०2009 - क्रमवारीत दुस-या स्थानी
० 2012 मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण आणि पहिले ग्रँडस्लॅम (यूएस ओपन)
० 2013 विम्बल्डन ग्रँडस्लॅम