आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tenis: Novok Yokovic, Martine Deal Potro Entered In Semifinall

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : नोवाक योकोविक, मार्टिन डेल पोत्रो उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाचा नोवाक योकोविक, आठवा मानांकित अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रो यांनी बुधवारी उपांत्य फेरीत प्रवेश केला.अव्वल मानांकित योकोविकने जबरदस्त कामगिरी करताना सातवी मानांकित चेक गणराज्यच्या टॉमस बर्डिचला 7-6, 6-4, 6-3 ने हरवले. इतर एका लढतीत आठवा मानांकित डेल पोत्रोने चौथा मानांकित स्पेनच्या डेव्हिड फेररला 6-2, 6-4, 7-6 ने मात दिली.


सानिया-होरिया अंतिम आठमध्ये
भारताची सानिया मिर्झा आणि रोमानियाच्या होरिया तेकाऊ यांनी बुधवारी सहज विजय मिळवताना विम्बल्डनच्या मिश्र दुहेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया आणि तेकाऊ यांनी अमेरिकेचा एरिक बुटोरेक आणि फ्रान्सची एलाईज कॉर्नेटला सरळ सेटमध्ये 6-1, 7-5 ने हरवले. सानिया आणि तेकाऊ यांनी सातपैकी चार ब्रेकपॉइंट मिळवले. त्यांनी पाच ऐस आणि विनर्स मारले.


बोपन्ना-वॅसलिन अंतिम आठमध्ये
14 वा मानांकित भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वॅसलिन यांनी क्वार्टर फायनलमध्ये धक्कादायक विजय मिळवताना पुरुष दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. बोपन्ना-वॅसलिन यांनी स्वीडनचा रॉबर्ट लिंडस्टेड आणि कॅनडाच्या डॅनियल नेस्टर यांना पाच सेटपर्यंत रंगलेल्या मॅरेथॉन सामन्यात 7-5, 7-6, 6-7, 6-7, 6-2 ने हरवले.