आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wimbledon Tenis : Randawasca, Lasica Entered In Finall

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : रांदावास्का, लिसिका उपांत्य फेरीत दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पोलंडची एग्निजस्का रांदावास्का व जर्मनीची सेबाईन लिसिकीने मंगळवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. चौथ्या मानांकित रांदावास्काने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व चीनच्या ली नावर 7-6, 4-6, 6-2 अशा फरकाने मात केली.दुसरीकडे लिसिकीने कैया कैनेपीवर 6-3, 6-3 ने विजय मिळवला. यासह तिने दुस-यांदा अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. यापूर्वी तिने 2011 मध्येही उपांत्य फेरी गाठली होती.
23 व्या मानांकित लिसिकीने अवघ्या 65 मिनिटांमध्ये कैनेपीचे आव्हान संपुष्टात आणले. तिने लढतीचा पहिला सेट 33 मिनिटांमध्ये जिंकला. तसेच दुसरा सेट 32 मिनिटांत आपल्या नावे केला.


योकोविक अंतिम आठमध्ये
पुरुष गटात जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानी असलेल्या नोवाक योकोविकने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये जर्मनीच्या टॉमी हासचा पराभव केला. सर्बियाच्या योकोविकने 6-1, 6-4, 7-6 ने सामना जिंकला.