आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस : योकोविक अंतिम फेरीत प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातील नंबर वन नोवाक योकोविकने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. त्याने उपांत्य लढतीत जुआन डेल पेत्रोचा पराभव केला. सर्बियाच्या योकोविकने 7-5, 4-6, 7-6, 6-3 ने सामना जिंकला. त्याने 4 तास 43 मिनिटांच्या लढतीत रोमहषर्क विजय मिळवला. जुआनने दुसरा सेट जिंकून बरोबरी मिळवली होती. मात्र, त्याचा पुढील सेटवर निभाव लागला नाही.


बार्टोली-लिसिकी आज फायनल
जर्मनीची सेबाइन लिसिकी व फ्रान्सची मारियन बार्टोली यांच्यात महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी शनिवारी अंतिम लढत होणार आहे. जर्मनीच्या तब्बल 16 वर्षांपासूनचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी लिसिकीला आहे. यापूर्वी 1996 मध्ये स्टेफी ग्राफने जर्मनीला विम्बल्डनमध्ये महिला एकेरीचा किताब मिळवून दिला होता.


23 व्या मानांकित लिसिकीने अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासात अनेक धक्कादायक विजय मिळवले. तिने जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेल्या सेरेनाला पराभूत केले. तिने सेरेनाला धूळ चारून स्पर्धेतील विजयी मोहीम अबाधित ठेवली.