आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस : विम्बल्डनमध्ये दुखापतीचे फोरहँड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपचा तिसरा दिवस खेळाडूंच्या दुखापतींनी गाजवला.ऑस्ट्रेलियन ओपनची चॅम्पियन व्हिक्टोरिया अजारेंका, राफेल नदालला हरवणारा स्टिव डार्सिससह पाच खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली.
दुसरी मानांकित बेलारूसची व्हिक्टोरिया अजारेंका विम्बल्डन टेनिस स्पर्धेतून बाहेर झाली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेली अजारेंका मंगळवारी रात्री महिला एकेरीच्या सामन्यात खेळण्यासाठी कोर्टवर आली नाही. यामुळे तिची विरोधी खेळाडू इटलीच्या लाविया पेनेटाला पुढे चाल मिळाली आणि ती तिसर्‍याफेरीत पोहोचली आहे. पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालला पराभूत करणारा स्टिव डार्सिस सुद्धा स्पर्धेबाहेर झाला आहे. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या डार्सिसचा सामना पोलंडच्या लुकास कुबोतसोबत होणार होता. मात्र, डार्सिस कोर्टवर खेळण्यास येऊ शकला नाही. यामुळे कुबोतला पुढे चाल मिळाली, तो तिसर्‍याफेरीत दाखल झाला.
महिला एकेरीत 19 वी मानांकित कार्ला सुआरेज नवारो आणि 29 वी मानांकित एलिजा कॉर्नट यांनी तिसर्‍याफेरीत प्रवेश केला आहे. स्पेनच्या नवारोने क्रोएशियाच्या लुसिच बारोनीला 1-6, 6-3, 6-3 ने आणि फ्रान्सच्या कॉर्नटने तैवानच्या सु वी हेशला 6-3, 6-2 ने मात दिली. पुरुष एकेरीच्या दुसर्‍याफेरीत सर्बियाच्या व्हिक्टर त्रोईकीने रशियाच्या आंद्रे कुजनेत्सोवला 6-4, 6-3, 6-4 ने हरवले. चेक गणराज्यचा रादेक स्तेपानेक, फ्रान्सचा ए. मेनारिना यांना पुढे चाल मिळाली. पुढे चाल मिळाली त्यावेळी स्तेपानेक पोलंडच्या जेर्जी जानोविकविरुद्ध 6-2, 5-3 ने पुढे होता. दुसरीकडे मोनारिनाचा विरोधी खेळाडू कोर्टवर खेळण्यास आला नाही.

मारिया शारापोवा स्पर्धेबाहेर
तिसर्‍यामानांकित मारिया शारापोवाला स्पर्धेच्या दुसर्‍याफेरीत पराभवाचा धक्का बसला. तिला 2004 ची चॅम्पियन मिशेल लार्चर डे ब्रीटोने 6-3, 6-4 अशा फरकाने पराभूत करून स्पर्धेबाहेर केले. स्पर्धेच्या तिसर्‍यादिवसातील हा दुसरा धक्कादायक निकाल आहे. यापूर्वी दोन वेळेचा चॅम्पियन राफेल नदाल स्पर्धेबाहेर झाला आहे.

महेश भूपती दुसर्‍याफेरीत
भारताचा दिग्गज टेनिसपटू महेश भूपती आणि त्याचा जोडीदार आॅस्ट्रियाच्या ज्युलियन नोल्स या आठव्या मानांकित जोडीने विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या पुरुष दुहेरीतील दुसर्‍याफेरीत प्रवेश केला आहे. भूपती आणि नोल्स यांनी अर्जेंटिनाचा लियानाद्रो मेयर आणि स्पेनचा अल्बर्ट रामोस यांना चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात 6-2, 6-7, 6-4, 6-2 ने हरवले. भूपती आणि नोल्स यांनी ही लढत दोन तास आणि 37 मिनिटांच्या संघर्षानंतर जिंकली. मात्र, मेयर आणि रामोस यांच्या जोडीने दुसरा सेट टायब्रेकरमध्ये खेचून 7-5 ने जिंकला. हा सेट 56 मिनिटे चालला.