आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्बल्डन टेनिस : डेव्हिड फेरर तिसर्‍या फेरीत; चार्डी, रॉबसन, ब्रायन बंधूंची आगेकूच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - स्पेनचा खेळाडू डेव्हिड फेररने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्याने आपल्याच देशाच्या आर. बाउस्टीचा पराभव केला. त्याने 6-3, 3-6, 7-6, 7-5 अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. दुसरीकडे फ्रान्सच्या निकोलस अलमाग्रोला अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडच्या जॉर्जी जानोविचने फ्रान्सच्या खेळाडूला पराभूत केले. त्याने 7-6, 6-3, 6-4 ने सामना जिंकून चौथी फेरी गाठली. दुसरीकडे युक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोव, फ्रान्सचा जेरेमी चार्डी, इंग्लंडची लॉरा रॉबसननेही विजय मिळवून पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित केला.

जगातील नंबर वन खेळाडू योकोविकला पावसाच्या व्यत्ययामुळे काही काळ अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान, त्याने पहिला सेट 7-6 ने जिंकून आघाडी घेतली होती. त्यानंतर ही लढत हॉलमध्ये खेळवण्यात आली. या वेळी दमदार खेळी करत त्याने अमेरिकेच्या बॉबीला 7-6, 6-3, 6-1 अशा फरकाने पराभूत केले. तसेच 26 व्या मानांकित डोल्गोपोलोवने कोलंबियाच्या सॅटिगो गिराल्डोचा 74, 7-5, 6-3 ने पराभव केला. 28 व्या चार्डीने र्जमनीच्या जॉन लेनार्ड स्ट्रफवर 6-2, 5-7, 7-6, 7-6 ने मात केली. फ्रान्सच्या रिचर्ड गास्के, क्रोएशियाच्या इवान डोडिग, हॉलंडच्या इगोर सिसिलिंगनेदेखील विजय मिळवून तिसर्‍या फेरीत धडक मारली.

महिला एकेरीत लॉरा रॉबसनने इंग्लंडच्या आशा कायम ठेवल्या. तिने दुसर्‍या फेरीत कोलंबियाच्या मेरिना डेकू मेरिनोला 6-4, 6-1 ने हरवले. यासह तिने यासह तिने करिअरमध्ये प्रथमच विम्बल्डनची तिसरी फेरी गाठली.

अँडी मुरे चौथ्या फेरीत
लंडन ऑलिम्पिक चॅम्पियन अँडी मुरेने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीची चौथी फेरी गाठली. त्याने तिसर्‍या फेरीत स्पेनच्या टी.रोबेड्रोचा 6-2, 6-4, 7-5 ने पराभव केला. विजयासाठी त्याला तब्बल 110 मिनिटे झुंज द्यावी लागली. ट्रायब्रेकरपर्यंत तिसरा सेट खेचला गेला. मुरेने हा सेट 41 मिनिटात आपल्या नावे केला. सारा इराणी दुहेरीत विजयी

इटलीच्या सारा इराणीने महिला दुहेरीचा सामना जिंकला. तिने आर.व्हिन्सीसोबत महिला दुहेरीच्या सामन्यात ग्राडिन-यु.उल्हिरोवाचा पराभव केला. सारा-व्हिन्सीने 6-2, 6-3 ने सामना जिंकला.

पेस विजयी; भूपतीचा पराभव
विम्बल्डनमध्ये भारतीय खेळाडूंना संमिर्श यश मिळाले. लियांडर पेसने पुरुष दुहेरीचा सामना जिंकून स्पर्धेत आगेकूच केली. मात्र, महेश भूपतीला पराभवामुळे स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. पेसने चेक गणराज्यच्या रादेक स्तेपानेकसोबत सलामी सामन्यात जोनाथन एर्लिच व डॅनियल ब्रेसिएलचा पराभव केला. या जोडीने 7-6, 6-4, 6-7, 6-4 ने सामना जिंकला. यासह त्यांनी दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. तसेच महेश भूपती व डॅनियेला हंतुचोवाचा मिर्श दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाला. या जोडीला मार्क नोल्स व सेबिना लिसिकीने 4-6, 7-6, 7-6 अशा फरकाने पराभूत केले.