आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Wimbledon Tennis Tournament: Sharapova, Federer Entered In Second Round, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : शारापोवा, फेडरर दुसर्‍या फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पाचवी मानांकित मारिया शारापोवा आणि चौथा मानांकित रॉजर फेडररने बुधवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत धडक मारली. सर्बियाची अँना इव्हानोविक, बाऊचर्डनेही विजयासह स्पर्धेत आगेकूच केली आहे.
रशियाच्या मारिया शारापोवाने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत इंग्लंडच्या समंथा मरेचा पराभव केला. पाचव्या मानांकित शारापोवाने 6-1, 6-0 ने सलामीचा सामना जिंकला. जगातील माजी नंबर वन अँना इव्हानोविकने पहिल्या फेरीत इटलीच्या एफ. स्चिवोनेला धूळ चारली. तिने लढतीत 7-6, 6-4 ने विजय मिळवला.

जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी असलेल्या इयुगेनीई बाऊचर्डनेही स्लोव्हाकियाच्या हतुंचोवाचा तिने 7-4, 7-5 ने हरवले.
जेलेना बाहेर :
सातव्या मानांकित जेलेना यांकोविकला महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला काइक कानेपीने 6-3, 6-2 ने पराभूत केले.
फेडररची लोरेन्झीवर मात :
पुरुष एकेरीतील चौथ्या मानांकित रॉजर फेडररने सलामी सामन्यात इटलीच्या पोलो लोरेन्झीवर 6-1, 6-1, 6-3 अशा फरकाने मात केली.