आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंडीजला पहिल्या कसोटीत फॉलोऑनची नामुष्की

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ड्युनेडीन - न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीज संघापुढे पराभव टाळण्याचे आव्हान आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 9 बाद 609 धावा काढल्या. यानंतर वेस्ट इंडीजचा पहिला डाव अवघ्या 213 धावांत आटोपला. विंडीजला फॉलोऑनच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले. तिस-या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी वेस्ट इंडीजने दुस-या डावात 2 बाद 168 धावा काढल्या होत्या.
वेस्ट इंडीजचा संघ 228 धावांनी मागे असून त्यांचे आठ गडी शिल्लक आहेत. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी डॅरेन ब्राव्हो नाबाद 72 आणि मार्लोन सॅम्युअल्स नाबाद 17 धावांवर खेळत होते. विंडीजकडून दुस-या डावात केरोन एडवर्ड्सने अर्धशतक ठोकताना 59 धावा काढल्या. एडवर्ड्सने 110 चेंडूचा सामना करताना 1 षटकार आणि 6 चौकार मारले. ब्राव्हो आणि एडवडर््स यांनी 119 धावांची शतकी भागीदारी केली. ब्राव्होने 130 चेंडूंचा सामना करताना 10 चौकार मारले.
पहिल्या डावात सपशेल गुडघे टेकले
न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडीजने पहिल्या डावात अवघ्या 213 धावांत गुडघे टेकले. त्यांच्याकडून शिवनारायण चंद्रपॉलने सर्वाधिक 76 धावा काढल्या. इतर खेळाडूंनी निराशा केली. ब्राव्होने 40 धावांचे योगदान दिले. यानंतरही त्यांचा डाव 213 धावांत आटोपला. पहिल्या डावात एडवर्ड्स (0), पॉवेल (7), मार्लोन सॅम्युअल्स (14), नरसिंग देवनारायण (15), रामदीन (12) यांना अपयश आले. न्यूझीलंडकडून टीम साऊथीने 52 धावांत 4, टीम बोल्टने 40 धावांत 3 गडी बाद केले. सोधीने दोघांना टिपले.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड : पहिला डाव 9/609. वेस्ट इंडीज पहिला डाव 213. (चंद्रपॉल 76, ब्राव्हो 40, 4/52 टीम साऊथी), वेस्ट इंडीज दुसरा डाव 2 बाद 168. (ब्राव्हो खेळत आहे 72, एडवर्ड्स 59).