आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विंटर ऑलिम्पिक आयोजनापासून बहुतांश देश चार हात लांबच..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ओस्लो चौथे शहर आहे ज्याने विंटर ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद घेण्यास नकार दिला आहे. यापूर्वी स्टॉकहोम, लवीव (युक्रेन) आणि क्राकोव (पोलंड) यांनी या स्पर्धा भरवण्यास नकार दिला आहे. दावेदारांमध्ये फक्त बीजिंग आिण अलमाटी उरले आहेत. ऑलिम्पिकच्या यजमानपदापासून पळण्याचे मुख्य कारण त्यावरील अफाट खर्च आहे.
मोठाखर्च - गेल्यावर्षी सोचीमध्ये हिवाळी ऑलिम्पिकवर रशियाने ५१ अब्ज डॉलर खर्च केले होते. ऑलिम्पिक आयोजनाच्या हिशेबाने हा खर्च जास्त आहे. २०१० मध्ये व्हँक्युअर क्रीडा स्पर्धांवर ६८ अब्ज डॉलर खर्च झाले.
मर्यादित भरपाई - २०१२च्याउन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांवर लंडनमध्ये १४ अब्ज डॉलर खर्च केले होते. आतापर्यंत स्पष्ट झाले नाही की, शहराला आर्थिक फायदा काय?
असंतोष- २०१६च्या समर ऑलिम्पिकवरील प्रचंड खर्चावरून ब्राझीलमध्ये तीव्र विरोध झाला. त्यामुळे अनेक शहरे नागरिकांच्या प्रतिक्रियेमुळे काळजीत असतात.
संदिग्ध भागीदार - आयोजनात भागीदारी असणाऱ्या अांतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात.