आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Chirs Gayle We Can Win The Matches Says Rp Singh

गेलशिवायही सामना जिंकू शकतो- आरपी सिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- ख्रिस गेलच्‍या योगदानाशिवायही आयपीएलमध्‍ये सामना जिंकता येऊ शकतो, हे सनरायजर्सविरूद्धच्‍या सामन्‍याने दाखवून दिल्‍याचे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज आरपी सिंगने म्‍हटले आहे.

नव्‍या हंगाम‍ातील पहिला सामना खेळणा-या आरपी सिंगने म्‍हटले की, लोक उगाचच फक्‍त गेलबाबत बोलतात. मात्र, आमच्‍याकडे विराट कोहली एबी डिव्हिलयर्ससारखे चांगले फलंदाजही आहेत. त्‍यामुळे गेल अपयशी ठरला तर आम्‍ही सामना जिंकू शकत नाही, असे म्‍हणता येणार नाही. यावेळी आरपी सिंगने कोहलीच्‍या शानदार खेळीचे कौतुक केले. हैदराबादविरूद्धची कोहलीची खेळी आयपीएलमधील सर्वश्रेष्‍ठ असल्‍याचे त्‍याने सांगितले. गोलंदाजीत चांगली कामगिरी केल्‍याने आनंद झाल्‍याचे त्‍याने म्‍हटले.