आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Sachin Cricket Continue, But Without Cricket Sachin ?

‘सचिनशिवाय क्रिकेट सुरू राहील; पण क्रिकेटशिवाय सचिन कसा राहू शकेल?’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तमाम क्रिकेटविश्व सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीमुळे हळहळत असताना त्याच्या कुटुंबीयांच्या त्याबाबतच्या भावना किती तीव्र असतील, याची कल्पनाही करता येत नाही. क्रिकेट मैदानाला अखेरचे अलविदा करताना सचिन जेवढा भावविवश झाला; त्याची पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ, बहीण अधिक दु:खी झाले.
सचिनची पत्नी अंजली त्याच्या अखेरच्या निरोपाच्या भाषणाच्या वेळी डोळे पुसण्यासाठी रुमाल शोधत होती. शेवटी असहाय होऊन ती हलकेच बोटांनी अश्रू टिपत होती. ते दृश्य पाहून आजूबाजूला उभ्या असलेल्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. स्वत:ला सावरून अंजली म्हणाली, ‘सचिनशिवाय क्रिकेट सुरू राहील; परंतु क्रिकेटशिवाय सचिन कसा राहू शकेल?’ अंजली पुढे म्हणाली, ‘सारा आणि अर्जुन या माझ्या दोन्ही मुलांना त्यांचे वडील किती मोठे आहेत, हे ठाऊक नाही; कळायचे त्यांचे वय नाही. त्यामुळे सचिनच्या प्रतिमेचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही.’
सचिनने रोहतक येथे रणजी सामना खेळताना खेळपट्टीला नमस्कार केला होता. त्यानंतर मुंबईतही कसोटीत फलंदाजीला उतरल्यानंतर त्याने खेळपट्टीला नमस्कार केला. सचिनला एवढे भावनाविवश झालेले मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते आणि शेवटी तर तो ड्रेसिंग रूममध्ये जाऊन ढसाढसा रडला. त्यामुळे निवृत्ती त्याने मनाला फारच लावून घेतली आहे, असे वाटते.
सचिनचा मोठा भाऊ नितीन म्हणाला, सचिनने आतापर्यंत आपल्या भावनांवर कमालीचा ताबा ठेवला होता. तो कधीही आपल्या भावना इतरांना कळू द्यायचा नाही. आज मात्र तसे घडले नाही. सचिनला घडवणारा त्याचा दुसरा भाऊ अजितही तेथे होता. संपूर्ण तेंडुलकर कुटुंबीय आई, बहीण व त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रेसिडेंट बॉक्समध्ये सचिनची प्रतीक्षा करत होते. सामना संपला आणि सचिन प्रथम आपल्या आईला येऊन भेटला. तिच्या पायाला हात लावला. भाऊ, बहीण व आप्तस्वकियांना भेटला. गुरू रमाकांत आचरेकरांचे त्याने आशीर्वाद घेतले. त्यांना म्हणाला, सर आता तुम्हाला यापुढे विचारावे लागणार नाही की, आता कोणता विक्रम करणार आहेस! अजित तेंडुलकरही सचिनच्या निवृत्तीमुळे सुन्न झाला होता. कित्येक वर्षांपासूनचा दिनक्रम यापुढे बदलेल, असे तो म्हणाला.
सचिनच्याच शिकवणीत, त्याचा आदर्श जपणा-या त्याच्या पत्नीने सचिनच्या आईला व्हीलचेअरवरून खाली उतरवताना चक्क त्यांचे पाय आपल्या हाताच्या दोन्ही पंज्यांवर धरून अलगद जमिनीवर ठेवले. उपस्थितांसाठी ती एक शिकवण होती.