आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Sachin Game Richness Low, Pak Media Said

सचिनविना खेळाची श्रीमंती हरपेल, पाक प्रसारमाध्यमांची सचिनवर स्तुतिसुमने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविना क्रिकेटची श्रीमंती हरपून तो दुबळा होईल, अशा शब्दांत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी त्याच्या निवृत्तीबाबत भाष्य केले आहे. उर्दू वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत फारसे छापले गेले नसले तरी पाकिस्तानमधील इंग्रजी वृत्तपत्रांनी भारताच्या सचिनवर स्तुतिसुमने उधळली आहेत.

‘दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळातील सर्वश्रेष्ठ फलंदाजाची निवृत्ती’ अशा शब्दांत सचिनच्या निवृत्तीवर भाष्य करण्यात आले आहे. ‘डॉन’ या पाकिस्तानातील प्रख्यात दैनिकाने, एका महान खेळाडूचे करिअर संपुष्टात येत असून जवळपास पाव शतक त्याचे कर्तृत्व झळाळून उठल्याचे त्यांनी नमूद केले आहे. कराचीला आंतरराष्ट्रीय करिअरचा प्रारंभ करणार्‍या या फलंदाजाने स्वत:च्या फलंदाजीच्या बळावर एकापाठोपाठ एक विक्रम प्रस्थापित केले. त्याची सर्व प्रकारांमधून झालेली शंभर शतके आणि कसोटीतील पंधरा हजारांहून अधिक धावा ही आकडेवारीच त्याचे मोठेपण सिद्ध करणारी असल्याचेही माध्यमांनी म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील प्रसारमाध्यमांनीही सचिनवर कौतुकाचा वर्षाव केला होता. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...