आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच वर्षांत परदेशात जिंकली नाही एकही कसोटी, तरीही अव्वल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - धोनीच्या टीमने विदेशातील मैदानावर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना जिंकण्याला सात महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. 23 जून 2013 रोजी बर्मिंघम येथे टीमने इंग्लंडविरुद्ध पाच धावांनी सामना जिंकला होता. मागील चार वर्षांत विदेशात झालेल्या 11 एकदिवसीय मालिकांपैकी भारताने नऊ मालिका गमावल्या आहेत. जिंकलेल्या दोन्ही एक-एक सामान्याची मालिका होती. एक बर्मिंघममध्ये इंग्लंड विरुद्ध आणि दुसरी 19 फेब्रुवारी 2011 रोजी बांगलादेशविरुद्ध ढाक्यातील सामना. घरच्या खेळपट्टीवर धोनीच्या कप्तानीत खेळलेल्या 60 एकदिवसीय सामन्यांपैकी आपण 36 जिंकले, तर 20 सामन्यांत पराभूत झालो.
कसोटी सामन्यात धोनीची कामगिरी खूपच वाईट आहे. त्याच्या कप्तानीत विदेशात खेळलेल्या 21 सामन्यांपैकी आपण फक्त पाच सामने जिंकू शकलो, तर 10 सामने हरलो. सहा सामने अनिर्णीत ठरले. भारतात खेळलेल्या 30 सामन्यांमध्ये धोनीच्या टीमने 21 जिंकले. बहुतांश सामने तर तीन किंवा चार दिवसांतच उरकले. तीन हरले आणि सहा अनिर्णीत.
20 जून 2011 रोजी भारताने किंगस्टन येथे वेस्ट इंडीजविरुद्धचा अखेरचा सामना जिंकला होता, तर घरच्या खेळपट्टीवर आयोजित 12 कसोटी मालिकांपैकी धोनीच्या टीमने 10 जिंकल्या आणि इंग्लंडविरुद्धची एक मालिका 1-2 ने गमावली. भारतीय मैदानावर गेल्या वर्षी झालेल्या सात सामन्यांपैकी आपण सहा जिंकले अणि एक अनिर्णीत ठेवला. ‘घर ही घर में शेर बनें और बाहर भीगी बिल्ली’, ‘आता आपण परदेशात खेळणेच बंद केले पाहिजे,’ पण एका प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ती अशी, ‘यापेक्षा चांगला कप्तान गांगुली होता. विदेशी टीमला त्यांच्याच मैदानांवर हरवून दाखवले.’
आकडेवारीनेही याला दुजोरा मिळतो. भारतीय टीमने गांगुलीच्या नेतृत्वात 28 कसोटी सामने खेळले आणि धोनीच्या नेतृत्वात 21 सामने. गांगुलीच्या संघाने 11 सामने जिंकले व 10 गमावले, तर धोनीच्या टीमने केवळ पाच सामने जिंकले आणि 10 सामने गमावले.
क्रिकेट समीक्षक अयाज मेमन म्हणतात, ‘गांगुली टीमच्या यशामागे तेंडुलकर, द्रविड आणि लक्ष्मणसारखे उत्तम बॅट्समन होते आणि कुंबळे, जहीर आणि हरभजनसारखे विकेट टेकिंग बॉलर होते. धोनीच्या टीममध्ये ती ताकद नाही. आपण जोपर्यंत देशांतर्गत सामन्यांत पाटा खेळपट्ट्यांवर खेळत राहू, तोपर्यंत विदेशातही आपली हीच स्थिती होईल.’