आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • WNBA Star Brittney Griner Gets Engaged To Her Female Partner Glory Johnson

लेस्बियन बास्केटबॉलपटूंनी केला सारखपुडा, सोशल साइट्सवर व्‍हायरल झाली छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - महिला बास्‍केटबॉलपटू ब्रिटनी ग्रेइनर(उजवीकडे) आणि पार्टनर ग्‍लोरी जॉन्‍सन)
टेक्‍सास - स्‍वत:लेस्बियन असल्‍याचे घोषित करुन क्रिडाजगतामध्‍ये वादळ उठवून देणारी दिग्‍गज बास्‍केटबॉलपटू ब्रिटनी ग्रेइनरने सहकारी महिला खेळाडूशी साखरपुडा केला. ब्रिटनीने ग्‍लोरीसमोर लग्‍नाच प्रस्‍ताव ठेवला. दोघींचे एकमत होताच त्‍यांनी साखरपुडा केला. आणि त्‍याची छायाचित्रे सोशल साइट्सवर पोस्‍ट केली.
पृथ्‍वीतलावरील सर्वांत आनंदी जोडपे
साखरपुड्यानंतर ब्रिटनीने सोशल साइट्सवर ''आम्‍ही दोघी पृथ्‍वीतलावरील सर्वांत आनंदी युगल आहोत. आता ग्‍लोरीच माझे आयुष्‍य आहे. गेल्‍या रात्रीमध्‍ये मी तिला प्रपोज केले होते ती रात्र मी कधीच विसरु शकणार नाही''.
ग्‍लोरीने शेअर केली छायाचित्रे
ब्रिटनीने सोशल साइट्सवर छायाचित्रे पोस्‍ट केल्‍यानंतर ग्‍लोरीने हे सर्व छायाचित्रे आपल्‍या अकाउंटवर शेअर केली. 12 तासांत याच्‍या फोटोला 11 हजार चाहत्‍यांनी लाइक केले आहे.

कोण आहेत ग्‍लोरी आणि ब्रिटनी ?
ब्रिटनी ग्रेइनर-
ब्रिटनी अमेरिकेची व्‍यावसायिक बास्‍केटबॉपटू आहे. ती फोनेक्‍स मर्क्‍यूरी(अमेरिका) संघाकडून खेळते. ब्रिटनी पहिली महिला खेळाडू आहे की जिने सर्वांधीक वेगाने 2000 गुण बनविले आहेत. 2012 मध्‍ये तिने उत्‍कृष्‍ट महिला बास्‍केटबॉलपटूचा किताब मिळविला.
ग्‍लोरी जॉन्‍सन
ग्‍लोरीसुध्‍दा अमेरिकेची बास्‍केटबॉलपटु आहे. ती तुल्‍सा शॉक (अमेरिका) संघाकडून खेळते. ग्‍लोरीने 2011 मध्‍ये वर्ल्‍ड युनिव्‍हर्सिटी खेळांमध्‍ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, ब्रिटनी आणि ग्‍लोरीचे छायाचित्रे