आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Cricket T 20 Match Srilanka Defeated India

मह‍िला क्रिकेट टी-20 सामन्यात श्रीलंकेने भारताला हरवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशाखापट्टनम - वनडे मालिकेतील पराभवातून सावरलेल्या श्रीलंका महिला टीमने भारताविरुद्ध टी-20 सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला. यासह पाहुण्या टीमने तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना रविवारी विशाखापट्टनम येथे होईल. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने 3 बाद 147 धावा काढल्या होत्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेने 19.5 षटकांत लक्ष्य गाठले. श्रीलंकेच्या जयाग्नी (21) व मदुशानी (15) या जोडीला सोनिया डबीरने तबूत पाठवले. त्यापाठोपाठ बी. मेंडिसला (4) राजेश्वरीने बाद केले. अखेर, श्रीवर्धनेने संघाचा डाव सावरला. तिने 39 चेंडूंत 52 धावा काढल्या. यासह तिने संघाचा विजय निश्चित केला. तिला रणसिंगेने (19) साथ दिली. गोलंदाजीत राजेश्वरीने तीन, एकता व सोनियाने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तत्पूर्वी, भारताला अनघा (23) व मितालीने (67) यांनी 71 धावांची सलामी दिली. मितालीने कौरसोबत 67 धावांची भागीदारी केली.