आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने केली ऐतिहासिक कामगिरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोशेग्लाडबक - भारतीय महिला संघाने रविवारी ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. या संघाने स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. विश्वचषकातील भारताचे हे पहिले पदक ठरले. तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला 3-2 ने पेनॉल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. निर्धारित वेळेपर्यंत हा रोमांचक सामना 1-1 ने बरोबरीत खेळवला गेला. अखेर, पेनाल्टी शूटआऊटमध्ये सामन्याच्या निकाल लागला. भारताची 18 वर्षीय स्ट्रायकर राणीने संघाला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून तोमनने गोल केला.

खेळाडूंना प्रत्येकी 1 लाख
वश्वचषक हॉकी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या भारतीय महिला संघातील प्रत्येक खेळाडूंसाठी हॉकी इंडियाने लाखाचे बक्षीस जाहीर केले. विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षकांना एक लाख व सपोर्ट स्टाफला 50 हजारांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा हॉकी इंडियाचे महासचिव नरेंद्र बत्रा यांनी केली. कोच नील हावगुडच्या मार्गदर्शनाखाली महिला संघाने यश संपादन केले.