आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका अपघातात झाली होती 80 टक्के पॅरालाईज्ड, आता 40 देशात शिकवते योगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडनमधील मॅरेथॉनपटू, योगगुरू टिफेनी जॉयनर.... - Divya Marathi
लंडनमधील मॅरेथॉनपटू, योगगुरू टिफेनी जॉयनर....
लंडन- लंडनची टिफेनी जॉयनर बाल्कनीतून पडल्यानंतर तिच्या कमरेखालच्या शरीरात अर्धांगवायू झाला. यापुढे चालू शकणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, आता ती मॅरेथॉनपटू असून, योगगुरूसुद्धा आहे. लांब पल्ल्याच्या शर्यतीत सहभागी होऊन ती चॅरिटीसाठी पैसे गोळा करते. आतापर्यंत तिने 40 देशांत हजारो लोकांना योग शिकवला. घटना आहे 2008 ची....
- जॉयनर दुबईत फिरायला गेली होती. एका हॉटेलच्या 25 फूट उंच बाल्कनीतून ती पडली.
- तिच्या मणक्याचे हाड मोडले. आता ती स्वत:च्या पायावर चालू शकणार नाही आणि तिला नेहमी अंथरुणावर राहावे लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
- तिचे 80 टक्के शरीर पॅरालाइज्ड झाले होते. मात्र, ती यामुळे दु:खी झाली नाही. या दुबळ्या बाजूला तिने वरचढ होऊ दिले नाही.
- जखमी होण्याआधीच तिने योगशिक्षकाची पदवी मिळवली होती. तिने पुन्हा योग सुरू करण्याचा निर्णय घेतला.
- एक पर्सनल ट्रेनरही ठेवले. सुरुवातीला तिला खास यश मिळाले नाही.
ट्रेनरसोबत रिकव्हरी तयार केला प्लॅन-

- या घटनेतून बाहेर पडत जॉयनरने ट्रेनरसोबत रिकव्हरी प्लॅन तयार केला.
- याचे कठोर पालन करण्यात तिने सुरुवात केली. दिवसांतील काही मिनिटे तिने चालण्यास सुरुवात केली.
- जॉयनरला नीट चालता येत नव्हते. पाय लडखडत होते. मात्र, ती हरली नाही.
- योग केल्याने तिला खूप फायदा झाला. व्हीलचेअरच्या जागी वॉकरचा उपयोग सुरू केला.
- यानंतर क्रचेसही उपयोगात आणले. आता ती पायात ब्रेसेस लावून चालते.
- यानंतर तिच्या पायावर शस्त्रक्रियासुद्धा झाली. पायांतील हाडांत इन्फेक्शन झाल्यामुळे अंगठे कापावे लागले.
- स्पाइनला मदत करण्यासाठी मेटल रॉड टाकण्यात आले. यानंतर तिने योगाशिवाय धावण्यास सुरुवात केली.
- छोट्या अंतराने सुरुवात केली आता ती लांब पल्ल्याच्या स्पर्धेत धावते.
जॉयनर म्हणते, योगामुळेच सर्व काही करू शकले-

- जॉयनर म्हणाली, “माझ्या जीवनातील हा खूप कठीण काळ होता. यामुळे माझे जीवन बदलले.
- मी या घटनेला कधीच विसरू शकत नाही. योगामुळे मला खूप फायदा झाला.
- यामुळे माझ्यासारख्या गरजू लोकांना मी योग शिकवण्याचे ठरवले.
- मी यासाठी सोशल मीडियाची मदत घेतली. त्याच्या मदतीने मी लोकांशी संलग्नित होऊ शकली.
- आतापर्यंत मी 40 देशांत लोकांना योग शिकवले आहे. यात बहुतेक पॅरालाइज्ड लोकांचा समावेश आहे.’
पुढे स्लाईडद्वारे पाहा, लंडनमधील टिफेनी जॉयनरचे योग मुद्रेतील वेगवेगळे फोटो...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...