आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- 2011 चे विश्वविजेते ठरलेल्या धोनीब्रिगेड नंतर आता वेळ आली आहे, भारतीय महिला क्रिकेट संघाची. आजपासून (गुरूवार) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर आयसीसी महिला विश्वचषकास सुरूवात होणार आहे. पहिला सामना यजमान भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या दरम्यान होणार आहे. आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या टीम इंडियावर.
या मालिकेत आठ संघ सहभाग घेणार आहेत. यजमान संघ भारत, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका हे संघ अ गटात तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ब गटात आहेत.
इंग्लंडच्या पुरूष संघाने एकदाही विश्वचषकाचे जेतेपद पटकावलेले नाही. पण त्यांच्या महिला संघाने तब्बल तीन वेळा ही कमाल केली आहे. टीम इंडियाने या विश्वचषकासाठी भरपूर तयारी केली आहे. नुकताच न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने आपली ताकद दाखवून दिली आहे. पूनम राऊत, तिरूष कामिनी आणि हरमनप्रीत कौर सारख्या स्टार फलंदाजांमुळे टीम इंडियाने प्रतिस्पर्धी संघासमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे.
फलंदाजीबरोबर टीम इंडियाची गोलंदाजी ही भक्कम आहे. जगात सर्वाधिक वेगाने गोलंदाजी टाकण्याचा विक्रम केलेली झूलन गोस्वामी त्याचबरोबर अमिता शर्मा आणि एकता बिष्ट सारख्या चांगले गोलंदाज टीम इंडियाकडे आहेत.
पुढच्या स्लाईडला क्लिक करून जाणून घ्या सलामीच्या सामन्यात कोणकोणत्या खेळाडू करतील धमाल...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.