आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women World Cup : After Sixteen Years West Windies Win

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला विश्‍वचषक : सोळा वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिस्बेन - वेस्ट इंडीजच्या पुरुष संघाने टी-20 क्रिकेट स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन असल्याचा मान कायम ठेवताना ऑस्ट्रेलियाला 27 धावांनी हरवले. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोणत्याही स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये 16 वर्षांनंतर वेस्ट इंडीजचा हा पहिला विजय ठरला. या लढतीत केरोन पोलार्डला (26 धावा आणि 3 विकेट) प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला.

वेस्ट इंडीजने या विजयापूर्वी फेब्रुवारी 1997 मध्ये पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाला हरवले होते. ब्रिस्बेन येथे झालेल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडीजने 6 बाद 191 धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. यानंतर कॅरेबियन गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 8 बाद 164 धावांवर रोखून विजय मिळवला. विंडीजकडून जे. चार्ल्स (57), डॅरेन ब्राव्हो (32), केरोन पोलार्ड (26), आंद्रे रसेल (नाबाद 23) यांनी चांगली फलंदाजी केली.