आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑस्‍ट्रेलियाने जिंकला महिला विश्‍वचषक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी बाजी मारून तब्बल सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचा विक्रम केला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 259 धावांचा सन्मानजनक स्कोअर उभा केला. प्रत्युत्तरात त्यांच्या गोलंदाजांनी विंडीजला 145 धावांत रोखून थरारक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून आर. हेन्स (52) आणि जे. कॅमरन (75) यांनी अर्धशतके ठोकली. कॅमरन प्लेअर ऑफ द मॅच तर एस.डब्ल्यू बेट्स प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची मानकरी ठरली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने साखळीत वेस्ट इंडीज महिलांकडून मिळालेल्या पराभवाचा हिशेब चुकता केला.

धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजची सुरुवात चांगली झाली नाही. विंडीजने अवघ्या 41 धावांत आपल्या तीन विकेट गमावल्या होत्या. विंडीजकडून कर्णधार आणि यष्टिरक्षक अँग्युलेराने सर्वाधिक 23 धावा काढल्या. नाइटने 21, डॉटिनने 22 तर सलामीवीर के. नाइटने 17 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी निराशा केली.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजीत पेरीने 19 धावांत 3, ओस्बोर्नने 26 धावांत 2, शूटने 38 धावांत 2 आणि लिसा स्थलेकरने 20 धावांत 2 गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाला लॅनिंग आणि हेन्स यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघींनी 52 धावांची सलामी दिली. दहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लॅनिंग 31 धावा काढून बाद झाली. तिने 41 चेंडूंत 6 चौकार मारले. यानंतर हेन्स आणि कॅमरन यांनी दुसर्‍या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. हेन्सने अर्धशतक ठोकले. तिने 74 चेंडूंत 6 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.

कर्णधार जे. फिल्ड्सने नाबाद 36 धावा काढल्या. तिने 38 चेंडूंत 4 चौकारांसह ही खेळी केली. इतर फलंदाजांनी निराशा केली. वेस्ट इंडीजकडून क्युटनीने 27 धावांत 3 गडी बाद केले. डेली, स्मार्ट आणि टेलर यांनी प्रत्येकी एकीला बाद केले. अष्टपैलू डॉटिनने या सामन्यात गोलंदाजी केली नाही.