आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला विश्‍वचषक : इंग्लंडचा सुपरसिक्समध्ये प्रवेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमुंबई - आन्या श्रबसोल (21 धावांत 4 विकेट) आणि एरेन ब्रिंडल (एकही धाव न देता तीन विकेट) यांच्या घातक गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडीजला 90 चेंडू शिल्लक ठेवून हरवले. या विजयासह इंग्लिश महिला टीमने आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सुपरसिक्समध्ये प्रवेश केला.

गतविजेता इंग्लंडने वेस्ट इंडीजच्या महिला संघाला 36.4 षटकांत 101 धावांत गुंडाळले. यानंतर 35 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा काढून अ गटात सलग दुसरा विजय मिळवला. श्रीलंकेकडून अखेरच्या चेंडूवर पराभव झाल्यानंतर इंग्लंडने शानदार पुनरागमन करून पुढचे दोन्ही सामने जिंकले. वेस्ट इंडीजकडून काईशोना नाईट (33) आणि शेनले डेली (नाबाद 30) यांनीच थोडाफार संघर्ष केला.

द. आफ्रिकाही पुढच्या फेरीत
कटक - मारिजेन केपची (नाबाद 102) फलंदाजी आणि गोलंदाजांच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर द. आफ्रिकेने पाकला ब गटात 126 धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत करून आयसीसी महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सुपरसिक्समध्ये प्रवेश केला. पाकिस्तानी संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. ब गटातून न्यूझीलंड, ऑ स्ट्रेलिया यांनी यापूर्वीच सुपरसिक्समध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
महिला वर्ल्डकप पॉइंट टेबल
अ गट संघ सामने वि./परा. गुण रनरेट
इंग्लंड 3 2/1 4 +0.641
श्रीलंका 3 2/1 4 -0.433
वेस्ट इंडीज 3 1/2 2 +0.276
भारत 3 1/2 2 -0.433

ब गट संघ सामने वि./परा. गुण रनरेट
ऑस्ट्रेलिया 3 3 6 +1.099
न्यूझीलंड 3 2/1 4 +1.430
द. आफ्रिका 3 1/2 4 -0.297
पाकिस्तान 3 0/3 0 -1.986